AFMC Pune Bharti 2024 मित्रांनो आज आपण सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या 6 रिक्त जागांच्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. सदरच्या भरती मधून वैज्ञानिक- सी, संशोधन सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ – III, डेटा एंट्री ऑपरेटर, मल्टी टास्किंग स्टाफ या पदाकरिता योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत. सदरील होणाऱ्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी 20 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे. सदरील भरतीसाठीइच्छुक उमेदवार ऑफलाइन पत्राद्वारे किंवा ऑनलाइन ईमेल द्वारे अर्ज पाठवू शकतात. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांच्याद्वारे सदरील भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहितीसाठी खाली देण्यात आलेल्या लेख काळजीपूर्वक वाचा.
- 6 रिक्त जागांसाठी सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय यांच्याद्वारे भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
- सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय येथील भरती द्वारे उमेदवारांकडून वैज्ञानिक- सी, संशोधन सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ – III, डेटा एंट्री ऑपरेटर, मल्टी टास्किंग स्टाफ ही रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
चंद्रपूर मध्ये नर्सिंग प्रशिक्षणाची सुवर्णसंधी.
AFMC Pune Bharti 2024 | सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा खालील प्रमाणे आहे.
- वैज्ञानिक- सी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमएससी इन लाइफ सायन्स किंवा संबंधित शाखेमधून उत्तीर्ण केलेली असावी. PCR , नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्स, सेंजर सिक्वेन्स यांसारखी मॉलिक्युलर टेक्निक उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेमधून ट्रेनिंग घेतलेले पाहिजे. उमेदवाराकडे संबंधित कामाचा कमीत कमी दोन वर्ष अनुभव असावा. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून पीएचडी पदवी मायक्रो बायोलॉजी, बायो केमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी यांसारख्या शाखेमधून उत्तीर्ण केलेली असेल आणि उमेदवाराकडे NGS बायो इंफॉर्मेशन संदर्भात ज्ञान असेल तर अशा उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल.
- संशोधन सहाय्यक या AFMC Pune Bharti 2024 पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून विज्ञान विषयातून पदवी मिळवलेली असावी. त्याचबरोबर उमेदवारांकडे मॉलिक्युलर बायोलॉजी या शाखेमध्ये काम केलेला तीन वर्षाचा अनुभव असावा किंवा उमेदवाराकडे पदव्युत्तर पदवी संबंधित विषयाची असावी.
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ – III या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 12 वी परीक्षा विज्ञान शाखेमधून उत्तीर्ण केलेली असावी. त्यानंतर उमेदवारांनी दोन वर्षाचा मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन कोर्स उत्तीर्ण केलेला असावा. किंवा उमेदवारांनी एक वर्षाचा DMLT कोर्स पूर्ण केलेला असावा आमच्या बाबत उमेदवाराकडे अनुभव असावा. किंवा उमेदवारांनी दोन वर्षाचा अनुभव हिस्तोपथ लॅब मध्ये पूर्ण केलेला असावा. ज्या उमेदवारांची बीएससी पदवी झालेली आहे अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
- डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवाराकडे मायक्रोसॉफ्ट वर्ड आणि एक्सेल याबद्दल चे ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे कॉम्प्युटर ऑपरेटिंग स्पीड 15000 बटन प्रतितास यापेक्षा कमी नसावे. ज्या उमेदवाराकडे दोन वर्ष संबंधित कामाचा शासकीय संस्था, ऑटोनॉमस संस्था, पब्लिक सेक्टर मधील संस्था येथील असेल अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
- मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
- वैज्ञानिक- सी या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 67,000 रुपये + 30 टक्के HRA मिळणार आहे.
- रिसर्च असिस्टंट या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना 35000 रुपये दरमहा वेतन मिळणार आहे.
- लॅब टेक्निशियन – III या पदावर नियुक्त असलेल्या उमेदवारांना दरमहा 20 हजार रुपये वेतन मिळणार आहे. त्याचबरोबर उमेदवारांना 30% HRA मिळणार आहे.
- डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना 20,000 रुपये दरमहा वेतन मिळणार आहे.
- मल्टी टास्किंग स्टाफ या पदावर नियुक्त केलेल्या उमेदवारांना दरमहा 18000 रुपये वेतन मिळणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवत असताना ‘ सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय, पुणे’ या पत्त्यावर पाठवायचा आहे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने ई-मेल द्वारे अर्ज पाठवत असताना आपला अर्ज ‘anurodhgoa@gmail.com’ या ईमेल आयडी वरती पाठवायचा आहे.
- सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- वैज्ञानिक- सी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 40 वर्षापर्यंत असावे.
- संशोधन सहाय्यक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 वर्षापर्यंत असावे.
- डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ते 40 वर्षापर्यंत असावेत.
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ – III या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 वर्षांपर्यंत असावे.
- मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 30 वर्षापर्यंत असावे.
AFMC Pune Bharti 2024 | सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय या पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय यांच्याद्वारे देण्यात आलेला अर्ज करण्याचा पत्ता आणि ईमेल आयडी या दोन माध्यमांद्वारे उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
- सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय यांच्याकडून अर्ज करण्याची कोणतीही ऑनलाईन प्रणाली म्हणजेच वेबसाईट देण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही लिंक द्वारे अर्ज करण्याचा प्रयत्न करू नये.
- सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय येथील भरतीसाठी ऑफलाइन पत्राद्वारे किंवा ऑनलाइन ईमेल द्वारे अर्ज करत असताना उमेदवारांनी स्वतःची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक अर्जामध्ये भरायची आहे. जर माहिती भरताना कोणत्याही प्रकारची चूक झाली तर अशा उमेदवारांचा अर्ज तात्काळ रद्द करण्यात येईल.
- सेना वैद्यकीय महाविद्यालय येथील AFMC Pune Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक 20 ऑक्टोबर 2024 आहे.
- सेना वैद्यकीय महाविद्यालय येथील AFMC Pune Bharti 2024 भरतीसाठी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.
AFMC Pune Bharti 2024 | सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- सेना वैद्यकीय महाविद्यालय येथील AFMC Pune Bharti 2024 भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला आहे असे उमेदवाराची भरतीसाठी पात्र असणार आहेत.
- सेना वैद्यकीय महाविद्यालय येथील भरतीसाठी येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला संस्थे कडून TA / DA देण्यात येणार नाही.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर आणि ईमेल आयडी वरती या दोन पद्धतीनेच भरतीसाठी अर्ज करावा.
- पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल मुलाखतीला येताना सर्व उमेदवारांनी फॉर्मल कपड्यावर येणे गरजेचे आहे.
- सदरील भरती करिता किती जागा रिक्त आहेत आणि प्रत्येक जागेसाठी कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे याबाबतची संपूर्ण माहिती सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांच्याकडून देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी की जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि पात्रतेची पूर्तता होत असेल तरच अर्ज करायचा आहे.
- जर उमेदवार इतर कोणत्याही संस्थेमध्ये काम करत असेल तर त्या संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र उमेदवारांनी मुलाखतीला येताना सोबत आणायचे आहे.
- सदरील AFMC Pune Bharti 2024 भरती मधील पदांवर नियुक्त होण्याकरिता कोणत्याही उमेदवाराने दबाव तंत्राचा उपयोग केला तर अशा उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येईल.
- पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना इतर कोणताही खाजगी व्यवसाय करता येणार नाही.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराला कोणत्याही प्रकरणांमध्ये न्यायालयाने दोषी ठरवलेले नसावे.
- पदावर नियुक्त होणारा उमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ असावा यासाठी उमेदवाराची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे.
- सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय येथील AFMC Pune Bharti 2024 भारती संदर्भात वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी जाहिरात वाचावे.