AIIMS Bharti 2024 | ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स दिल्ली येथे 77 जागांसाठी भरती.

AIIMS Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे निघालेल्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. सदरील होणाऱ्या भरती मधून 77 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ” कनिष्ठ रहिवासी” या पदावर योग्य उमेदवारांची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. 13 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. या भरती मधून पदावर उमेदवारांची निवड करण्याकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स यांच्याद्वारे प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहिती करिता खालील देण्यात आलेला लेख वाचावा.

  • 77 रिक्त जागा भरण्याकरिता ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स यांच्याकडून सदरील AIIMS Bharti 2024 भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
  • ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथील होणाऱ्या भरती मधून ” कनिष्ठ रहिवासी ” या पदाकरिता योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.

समाज कल्याण विभाग येथे भरती.

AIIMS Bharti 2024
AIIMS Bharti 2024

AIIMS Bharti 2024 | ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथील भरती करिता आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा खालील प्रमाणे.

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS), नवी दिल्ली अंतर्गत होणाऱ्या ‘ कनिष्ठ रहिवासी ‘ पदाच्या भरती संदर्भात माहिती खालील प्रमाणे.

जाहिरात प्रसिद्ध झाल्याचे तारीख: 04 नोव्हेंबर 2024

स्थान: ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, नवी दिल्ली, शैक्षणिक विभाग

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS), नवी दिल्ली, संसदेत पास झालेल्या कायद्यानुसार या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. ही एक स्वायत्त संस्था आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ही भारतातील एक प्रमुख संस्था आहे. या संस्थेद्वारे मेडिकल सायन्सेसच्या विविध शाखांमध्ये अंडरग्रॅज्युएट आणि पोस्टग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिले जाते.

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कडून ‘ कनिष्ठ रहिवासी’ च्या पदांसाठी UR, OBC, SC, ST, आणि EWS श्रेणीतील उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत.

AIIMS Bharti 2024 | महत्त्वाची माहिती

  • भरती प्रक्रिया: मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येईल.
  • मुलाखतीची तारीख: 13.11.2024
  • वेळ: सकाळी 9:00 वाजता उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहावे.
  • स्थळ: जवाहरलाल सभागृह/कॉन्फरन्स हॉल, AIIMS, नवी दिल्ली
  • अर्जाची शेवटची तारीख: 09 नोव्हेंबर 2024, दुपारी 1:00 वाजेपर्यंत

AIIMS Bharti 2024 | पात्रता (Eligibility)

  1. प्रतिक करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून MBBS (इंटर्नशिपसह) किंवा MCI मान्यताप्राप्त समकक्ष पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
  2. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे DMC रजिस्ट्रेशन निवडीनंतर असणे आवश्यक आहे.
  3. फक्त ते उमेदवार पात्र असतील ज्यांनी 14 नोव्हेंबर 2021 ते 13 नोव्हेंबर 2024 दरम्यान MBBS उत्तीर्ण केलेले आहे.
  4. अर्ज केलेल्या उमेदवारांनी मूळ कागदपत्रे ( पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र, अप्रेंटिस प्रमाणपत्र, जन्मतारीख प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, आणि MCI/DMC रजिस्ट्रेशन) सोबत आणणे आवश्यक आहे.

अर्ज प्रक्रिया (Application Process)

  • अर्ज फॉर्म कसा मिळवायचा?
  • अर्जाचा फॉर्म AIIMS च्या अधिकृत वेबसाईट्स www.aiims.edu किंवा www.aiimsexams.ac.in वर उपलब्ध आहे.
  • ऑफलाइन अर्ज फॉर्म
  • शैक्षणिक विभागमधून सोमवार ते शुक्रवार (10:00 AM ते 4:00 PM) आणि शनिवारी (10:00 AM ते 12:00 PM) वेळेत मिळवता येईल.
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता
  • अर्जदारांनी पूर्ण भरलेला अर्ज AIIMS अकॅडमिक सेक्शन येथे 09.11.2024 रोजी 1:00 PM पर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. उशिरा मिळालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.

 मुलाखत प्रक्रिया (Interview Process)

  • वेटिंग लिस्ट मधील उमेदवारांसाठी पुढील नियम.
  • जुलै 2024 सत्रातील वेटिंग लिस्टमधील उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे.
  • नवीन उमेदवार
  • वेटिंग लिस्टनंतर रिक्त राहिलेल्या पदांसाठी नवख्या उमेदवारांची काऊन्सलिंग करण्यात येईल.

महत्त्वाच्या सूचना (Important Instructions)

  • अर्ज केलेल्या कोणत्याही उमेदवाराला भरती संदर्भातील माहिती ई-मेल द्वारे कळविण्यात येणार आहे. अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला पत्र पाठवण्यात येणार नाही. याचे त्यांनी नोंद घ्यायची आहे.
  • सदरील भरती मधील दिलेल्या पदांच्या संख्येमध्ये बदल होऊ शकतो. यासंदर्भात माहिती उमेदवारांना देण्यात येईल. बदल करण्याचा पूर्णपणे अधिकार संस्थेकडे असणार आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी केल्याशिवाय उमेदवारांना मुलाखतीसाठी परवानगी देण्यात येणार नाही. याचे त्यांनी काळजी घ्यायची आहे.

संपर्क:

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS)

अकॅडमिक सेक्शन, अन्सारी नगर,

नवी दिल्ली – 110029

संपादित: रजिस्ट्रार

AIIMS Bharti 2024 | इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, दिल्ली येथील भरती करिता इच्छुक उमेदवारांना सूचना खालील प्रमाणे.

  • ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स दिल्ली भरती करिता इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. या भरती मधून उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. उमेदवारांनी मुलाखतीला येताना अर्ज सोबत घेऊन यायचे आहेत. मुलाखतीचा पत्ता उमेदवारांना जाहिरातीमध्ये देण्यात आलेला आहे.
  • ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथील भरती करिता उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा नाही. कारण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उमेदवारांकरिता देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्याही फसव्या वेबसाईट द्वारे उमेदवारांनी अर्ज करायची नाही. ऑनलाइन फसवणूक झाल्यास त्याला उमेदवार स्वतः जबाबदार असेल.
  • मुलाखतीला येताना सर्व उमेदवारांनी फॉर्मल कपड्यावर यायचे आहे. येताना सोबत आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे घेऊन यायचे आहेत. या भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची खडाखोड करायची नाही. किंवा अर्जामध्ये चुकीची माहिती लिहायची नाही. चुकीची माहिती लिहिणाऱ्या उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येणार आहे.
  • 13 नोव्हेंबर 2024 या तारखेला उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे. उशिरा येणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार नाही.
  • ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स यांनी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच उमेदवारांनी भरतीच्या प्रक्रिय करिता अर्ज करायला सुरुवात करायची आहे.
  • ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथील भरती करिता ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत असे उमेदवारास सदरील भरती करिता पात्र ठरणार आहेत. अर्ज न करणाऱ्या उमेदवाराला मुलाखतीसाठी प्रवेश देण्यात येणार नाही.
  • ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथील भरतीच्या मुलाखतीकरिता उमेदवारांनी स्वतःच्या खर्चाने यायचे आहे. संस्थे कडून कोणत्याही उमेदवाराला TA / DA देण्यात येणार नाही याची नोंद घ्यायची आहे.
  • ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथील भरती करिता उमेदवारांनी अनुचित प्रकार केला तर आशा उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येईल. भरती दरम्यान अनुचित प्रकार करणाऱ्या उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, दिल्ली यांच्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यायचे आहे. भेट देण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथील भरती करिता वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
  • ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण दिल्ली असणार आहे.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 56,100 रुपये वेतन मिळणार आहे.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना ग्रेड पे 5400 रुपयांचा मिळणार आहे.

Leave a Comment