Indian Army TES Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण भारतीय सैन्य TES अंतर्गत निघालेल्या 90 पदांच्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. या भरती मधून एकूण 90 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. याबाबत जाहिरात भारतीय सैन्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 5 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक आहे. ” तांत्रिक प्रवेश योजना (TES- 53 ) ” या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून करण्यात येणार आहे. भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी या भरती करिता अर्ज करायचा आहे. प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. भारतीय सैन्य TES भरती संदर्भात माहिती खालील प्रमाणे.
- 90 रिक्त जागा भारतीय सैन्य TES यांच्याद्वारे भरण्यात येणार आहेत.
- ” तांत्रिक प्रवेश योजना (TES- 53 ) ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड भारतीय सैन्य भरती मधून केली जाणार आहे.
महाराष्ट्रातील सर्व नोकरीच्या अपडेट्स मिळवण्याकरिता येथे क्लिक करा.
Indian Army TES Bharti 2024 | भारतीय सैन्य TES येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक अटी खालील प्रमाणे आहेत.
- सदरील Indian Army TES Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 12 वी परीक्षा फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स हे विषय घेऊन 60% गुणांनी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
- जुलै 2025 पासून 12 वीच्या उमेदवारांना टेक्निकल एन्ट्री स्कीम च्या द्वारे ‘ TES – 53 ‘ या कोर्स साठी प्रवेश दिला जाणार आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना 12 वीच्या गुणांच्या आधारे सदरील भरतीसाठी प्रवेश दिला जाणार आहे.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने JEE ( Mains ) 2024 ही परीक्षा दिलेली असणे आवश्यक आहे.
- Indian Army TES Bharti 2024 या भरतीसाठी दिनांक 9 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज करायला सुरुवात होणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे 1 जुलै 2025 रोजी वय साडे सोळा ते साडे 19 दरम्यान असले पाहिजे. भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार 2 जानेवारी 2006 अगोदर जन्मलेला नसावा. 1 जानेवारी 2009 नंतर उमेदवार जन्मलेला नसावा.
- सदरील भारती मधून ज्या पुरुष उमेदवारांचे लग्न झालेले नाही आशा उमेदवारांकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांमधून योग्य उमेदवारांचे शॉर्ट लिस्टिंग चालू होईल. शॉर्ट लिस्टिंग केलेल्या उमेदवारांची SSB चाचणी घेण्यात येईल. SSB लग्न झालेल्या उमेदवारांची मेडिकल तपासणी करण्यात येईल. मेडिकल तपासणी केल्यानंतर उमेदवारांची मेरिट लिस्ट जाहीर करण्यात येईल. त्यानंतर उमेदवारांना पदावर नियुक्ती देण्यात येईल.
- डिसेंबर 2024 च्या पहिल्या आठवड्यामध्ये शॉर्ट लिस्टिंग केलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल.
- जानेवारी ते मार्च 2025 दरम्यान पाच दिवसाची SSB चाचणी घेण्यात येईल.
- उमेदवारांचे प्री कमिशन ट्रेनिंग इंडियन मिलिटरी अकॅडमी, डेहराडून येथे घेण्यात येईल.
- पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी ट्रेनिंगचा कालावधी चार वर्षाचा राहील.
- चार वर्षानंतर उमेदवारांना इंजिनिअरिंग शाखेची पदवी मिळणार आहे.
- नियुक्त झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणादरम्यान 56,100 रुपये दरमहा मानधन देण्यात येणार आहे.
- सदरील ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना लेफ्टनंट ही रँक देण्यात येणार आहे.
- ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराला वार्षिक वेतन 17 – 18 लाख रुपये प्रति महा मिळणार आहे.
- सदरील Indian Army TES Bharti 2024 भरती करिता अर्ज करणारा उमेदवार भारताचा नागरिक असावा किंवा नेपाळचा घटक असावा.
- वयाचा पुरावा म्हणून 10वी बोर्ड सर्टिफिकेट मान्य केले जाईल. इतर कोणताही पुरावा वयाचा पुरावा म्हणून मान्य करता येणार नाही.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सांगितलेली जन्मतारीख रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात येईल. त्यानंतर उमेदवाराला जन्मतारीख रेकॉर्ड मधून बदल येणार नाही.
- सदरील भरतीसाठी उमेदवारांना मेडिकल आणि फिजिकल चाचण्यांना सामोरे जावे लागणार आहे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराचे चार वर्ष प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला लेफ्टनंट पदाचा दर्जा बहाल करण्यात येईल.
- सुरुवातीचे तीन वर्षाचे ट्रेनिंग उमेदवाराला पुण्यामध्ये देण्यात येईल.
- त्यानंतरच्या ट्रेनिंग उमेदवाराला एक वर्षासाठी देहरादून या ठिकाणी देण्यात येईल.
- उमेदवारांना नवीन ड्रेस करिता 20000 रुपये प्रति वर्षी देण्यात येणार आहेत.
- भारतीय सैन्य TES यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा.
- भारतीय सैन्य TES येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
Indian Army TES Bharti 2024 | भारतीय सैन्य TES येथील भरतीसाठी महत्त्वाच्या सूचना खालील प्रमाणे आहेत.
- भारतीय सैन्य TES येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत. असे उमेदवारच भरतीसाठी पात्र असतील. कारण सदरील भरती ही एक प्रकारच्या ट्रेनिंग प्रोग्राम साठी होणार आहे. हा ट्रेनिंग प्रोग्राम चार वर्षे चालणार आहे. इतर कोणत्याही उमेदवाराला या भरतीमध्ये समाविष्ट होता येणार नाही.
- भारतीय सैन्य TES येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा TA / DA देण्यात येणार नाही.
- भारतीय सैन्य TES येथील भरती प्रक्रियेमध्ये कोणत्याही उमेदवाराने अनुचित प्रकार केला तर अशा उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- भारतीय सैन्य TES येथील भरती साठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी किंवा SSB टेस्ट साठी सर्व उमेदवारांनी हॉल तिकीट घेऊन उपस्थित राहायचे आहे. त्याशिवाय परीक्षा केंद्रावर उमेदवाराला प्रवेश दिला जाणार नाही.
- भारतीय सैन्य TES येथील भरती NDA येथील उमेदवारांची निवड करण्याकरिता घेण्यात येणार आहे. यासंदर्भात अधिक माहिती मिळवण्याकरिता उमेदवारांनी संकेतस्थळाला भेट द्यावी.
Indian Army TES Bharti 2024 | भारतीय सैन्य TES येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- भारतीय सैन्य TES येथील Indian Army TES Bharti 2024 भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा करिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
- ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतेही सुविधा भारतीय सैन्य कडून देण्यात आलेली नाही.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत असताना उमेदवाराने स्वतःची जन्मतारीख, पासपोर्ट साईज फोटो, सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पत्ता, पिनकोड सत्य आणि बरोबर सादर करायचे आहेत. अर्ज भरताना चुकी झाल्यानंतर त्या उमेदवाराचा अर्ज तात्काळ बाद होऊ शकतो.
- सदरील Indian Army TES Bharti 2024 भरती करिता अर्ज करण्याची शेवटची दिनांक 5 नोव्हेंबर 2024 ही आहे.
- तांत्रिक प्रवेश योजना ( TES – 53 ) येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Indian Army TES Bharti 2024 | भारतीय सैन्य TES येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील तारीख लक्षात ठेवा.
- 9 ऑक्टोबर 2024 या तारखेपासून सदरील भरती करिता अर्ज करायला सुरुवात झालेली आहे.
- 5 नोव्हेंबर 2024 ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 5 नोव्हेंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- भरती मधून पदावर नियुक्त झाल्यानंतर उमेदवारांना शहरांसाठी ट्रान्सपोर्ट अलाउन्स 7200 रुपये देण्यात येईल.
- भरती मधून पदावर नियुक्त झाल्यानंतर उमेदवारांना इतर ठिकाणी ट्रान्सपोर्ट अलाउन्स 3600 रुपये देण्यात येईल.
- हैदराबाद, पटना, दिल्ली, औरंगाबाद, सुरत, बेंगलोर, कोची, कोजी कोडे, इंदोर, ग्रेटर मुंबई, नागपुर, पुणे, जयपूर, चेन्नई, कोइंबतूर, कानपूर, लखनऊ, कोलकाता यांसारख्या शहरांमध्ये ट्रॅव्हल अलाउन्स 7200 रुपये देण्यात येईल.
- सदरील Indian Army TES Bharti 2024 भरतीसाठी वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. आणि त्यानंतर अर्ज करावा. या भरती संदर्भातील अधिक माहितीसाठी उमेदवार संकेत स्थळाला सुद्धा भेट देऊ शकतात.
- संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतरच उमेदवारांनी सदरील भरतीसाठी अर्ज करायचा आहे.