MGM College Nanded Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण MGM संगणक शास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय नांदेड येथील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सदरील होणाऱ्या भरती मधून 17 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरती मधून ‘ प्राध्यापक’ या पदाकरिता योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत. 26 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी सदरील भरतीसाठी ऑनलाइन ईमेल द्वारे अर्ज करायचा आहे. MGM संगणक शास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय नांदेड येथील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता इच्छुक उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून समजून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर अर्ज करायला सुरुवात करायचे आहे. अधिक माहिती करिता खाली देण्यात आलेला लेख काळजीपूर्वक उमेदवारांनी वाचावा.
- 17 जागा भरण्यासाठी MGM संगणक शास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय नांदेड यांच्याकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.
- प्राध्यापक या पदावर काम करणारे योग्य उमेदवार सदरील भारती द्वारे निवडण्यात येणार आहेत.
आत्मा मलिक शैक्षणिक संस्था येथे भरती.
MGM College Nanded Bharti 2024 | MGM संगणक शास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, नांदेड येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा खालील प्रमाणे.
- संगणक विज्ञान, संगणक अनुप्रयोग, जैवतंत्रज्ञान, बायोइन्फॉर्मेटीक्स या विषयां करिता प्राध्यापकांची निवड केली जाणार आहे.
- प्राध्यापक ( कॉम्प्युटर सायन्स ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून M.Sc SE / CS / MCS यापैकी कोणतीही पदवी उत्तीर्ण केलेली असणे गरजेचे आहे.
- प्राध्यापक ( संगणक अनुप्रयोग ) या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून MCA / ME / M.Tech. CS / IT ही पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
- प्राध्यापक ( जैवतंत्रज्ञान ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून M.Sc. Biotechnology / Microbiology यापैकी कोणतीही पदवी उत्तीर्ण केलेले असणे आवश्यक आहे.
- प्राध्यापक (बायोइन्फॉर्मेटीक्स) या पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून M.Sc. Bioinformatic ही पदवी मिळवलेली असणे आवश्यक आहे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता कोणत्याही प्रकारचा शुल्क नाही.
- या भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या सर्व उमेदवारांना नियमानुसार वेतन देण्यात येईल.
- संगणक विज्ञान या पदाकरिता एकूण सहा जागा रिक्त आहेत. संगणक अनुप्रयोग या पदासाठी एकूण सहा जागा रिक्त आहेत. जैवतंत्रज्ञान प्राध्यापक या पदाकरिता तीन जागा रिक्त आहेत. बायो इन्फॉर्मेशन प्राध्यापक या पदाकरिता एकूण दोन जागा रिक्त आहेत.
- जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून उमेदवारांनी आठ दिवसाच्या आत मध्ये सदरील भरती करिता अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक 26 ऑक्टोबर 2024 आहे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण नांदेड शहर असणार आहे.
- या भरती करिता इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी ऑनलाइन ईमेल द्वारे अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज करण्याचा ई-मेल आयडी principal@mgmccsit.ac.in या ईमेल आयडी वरती इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
- MGM संगणक शास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, नांदेड यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पहा.
- सदरील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांमधून NET / SET / Phd उत्तीर्ण आणि अनुभव असलेल्या उमेदवारांना मुलाखतीकरिता प्राधान्य देण्यात येईल.
MGM College Nanded Bharti 2024 | MGM संगणकशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, नांदेड येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकरिता सूचना खालील प्रमाणे.
- MGM संगणकशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय येथील भरती करिता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. ऑनलाइन अर्ज करत असताना उमेदवारांनी संस्थेद्वारे देण्यात आलेल्या ईमेल आयडी द्वारे अर्ज करायचे आहेत.
- सदरील भरती करिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा MGM संगणकशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय द्वारे देण्यात आलेली नाही. किंवा ऑनलाईन वेबसाईट द्वारे अर्ज करण्याची सुविधा देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्याही उमेदवारांनी यापैकी कोणत्याही प्रकारे अर्ज करायचे नाहीत..
- ई-मेल द्वारे अर्ज करत असताना कोणत्याही उमेदवारांनी अर्जामध्ये चुकीची माहिती लिहायची नाही. कर्जामध्ये चुकीची माहिती लिहिणे किंवा अपूर्ण अर्ज भरणे असे करणाऱ्या उमेदवारांचा अर्ज तात्काळ रद्द करण्यात येईल. आणि या सर्वांना उमेदवार जबाबदार असेल.
- 26 ऑक्टोबर 2024 भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक MGM संगणकशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय यांच्याकडून देण्यात आलेली आहे.
- सदरील भरती करिता अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी MGM संगणकशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. आणि त्यानंतर इच्छुक उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करायला सुरुवात करायची आहे.
MGM College Nanded Bharti 2024 | MGM संगणकशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता सूचना खालील प्रमाणे.
- MGM संगणकशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी ऑनलाइन ईमेल द्वारे अर्ज केलेले आहेत. असे उमेदवार सदरील भरतीच्या प्रक्रियेमध्ये पात्र ठरणार आहेत.
- सदरील भरतीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला MGM संगणकशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, नांदेड यांच्याकडून TA / DA देण्यात येणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे.
- MGM संगणकशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय येथील भरतीच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही उमेदवाराने जर अनुचित प्रकार केला तर आशा उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या उमेदवारांचे अर्ज रद्द करण्यात येणार आहेत.
- MGM संगणकशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय या संस्थेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याकरिता इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी संस्थेच्या संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक आहे.
MGM College Nanded Bharti 2024 | MGM संगणकशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय येथील भरती संदर्भात अधिक माहितीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
- 20 डिसेंबर 1982 रोजी महाराष्ट्रातील नांदेड येथे महात्मा गांधी मिशन ट्रस्ट ची स्थापना झालेली होती. महाराष्ट्रातील मराठवाडा विभागामध्ये विकसनशील असणाऱ्या भागामध्ये उत्कृष्ट गुणवत्तेची शिक्षण आणि वैद्यकीय सुविधा देण्यासाठी या ट्रस्टची स्थापना करण्यात आलेली होती. या संस्थेचा मुख्य उद्देश आरोग्यविषयक सुविधा, शालेय शिक्षण, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण सर्व लोकांपर्यंत पोहोचवणे हा या संस्थेचा प्राथमिक उद्देश होता. औरंगाबाद, नवी मुंबई, परभणी या महाराष्ट्रातील शहरांमध्ये आणि उत्तर प्रदेश मधील नोएडा येथे या संस्थेचा विस्तार करण्यात आलेला आहे.
- इंजीनियरिंग, आर्किटेक्चर, मेडिकल, नर्सिंग, स्थापत्य, कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायो टेक्नॉलॉजी, बायो इन्फॉर्मेशन, फायन आर्ट, जर्नालिझम इत्यादी शाखेमध्ये शिक्षण देण्याची सुविधा सदरील संस्थेकडून देण्यात आलेली आहे. या संस्थे कडून खेळाडूंना सुद्धा मदत करण्यात येत असते. विद्यार्थ्यांच्या फिजिकल फिटनेस कडे लक्ष देण्याकरिता संस्थेने विशेष प्रयत्न केलेले आहेत.
- महात्मा गांधी मिशन कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड आयटी हे कॉलेज नांदेड या ठिकाणी स्थित आहे. 2000 रोजी या कॉलेजची स्थापना झालेली आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्या अंतर्गत सदरील कॉलेज येते. महाराष्ट्र शासनाद्वारे या कॉलेजला परवानगी देण्यात आलेली आहे. नांदेड शहर हे महाराष्ट्रातील एक विकसित शहरांप्रमाणे शहर आहे. या शहरांमध्ये आधुनिक रस्ते आणि रेल्वे सुविधा आहेत. त्याचप्रमाणे या शहराला ऐतिहासिक वारसा आहे. या कॉलेजचा कॅम्पस नांदेड नागपूर हायवे पासून 3 केएम दूर डोंगरावर स्थित आहे. सदरील कॉलेजचा कॅम्पस 20 एकर मध्ये पसरलेला आहे. संपूर्ण स्वच्छ आणि सुशोभित केलेला असा या कॉलेजचा कॅम्पस आहे.