MPSC Group C Bharti 2024 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 1333 गट- क च्या जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

MPSC Group C Bharti 2024  नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत निघालेल्या ‘ गट- क ‘ च्या भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 1333 जागांसाठी योग्य उमेदवारांची निवड करण्याकरिता भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. 4 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरती करिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे. उद्योग निरीक्षक, कर सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, बेलीफ व लिपिक गट क, लिपिक- टंकलेखक या पदांसाठी सदरील भरती मधून योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. ऑनलाइन पद्धतीने सदरील भरतीसाठी सर्व उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

  • 1333 जागा भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत भरती निघालेली आहे.
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत होणाऱ्या भरती मधून उद्योग निरीक्षक, कर सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, बेलीफ व लिपिक गट क, लिपिक- टंकलेखक  या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

महिला व बालकल्याण विकास संचालनालय, गोवा भरती

MPSC Group C Bharti 2024 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत होणाऱ्या भरती साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे आहे.

  • उद्योग निरीक्षक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी मिळवलेली असणे आवश्यक आहे. किंवा तंत्रज्ञान क्षेत्रातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी मिळवलेली असणे आवश्यक आहे.
  • कर सहाय्यक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे मराठी टंकलेखन 30 शब्द प्रतिमिनिट आणि इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट असणे आवश्यक आहे.
  • तांत्रिक सहाय्यक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पदवीधर पदवी मिळवलेली असणे आवश्यक आहे.
  • बेलिफ व लिपिक गट क, नगरपाल (शेरीफ) मुंबई यांचे कार्यालय या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेले असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी टंकलेखन 30 प्रतिशब्द प्रति मिनिट असणे आवश्यक आहे.
MPSC Group C Bharti 2024
MPSC Group C Bharti 2024
  • लिपिक-टंकलेखक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेले असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रतिमिनिट आणि मराठी टंकलेखन 30 शब्द प्रतिमिनिट असणे आवश्यक आहे.
  • शैक्षणिक पात्रता अधिक विस्तृतपणे समजून घेण्याकरिता उमेदवारांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 फेब्रुवारी 2025 रोजी 19 ते 38 वर्षापर्यंत असावे. मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ या प्रवर्गात वयामध्ये पाच वर्ष सूट देण्यात आलेली आहे.
  • संयुक्त पूर्व परीक्षा या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क 394 रुपये आहे. तर मागास प्रवर्गातील उमेदवारांना 294 रुपये आहे.
  • मुख्य परीक्षे करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 544 रुपये शुल्क असणार आहे. मागास प्रवर्गातील उमेदवारांना 344 रुपये शुल्क असणार आहे.
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत घेणाऱ्या येणाऱ्या भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे.
  • सदरील भरतीसाठी होणाऱ्या परीक्षे करिता परीक्षा केंद्र संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यातील च्या ठिकाणी असेल.
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

MPSC Group C Bharti 2024 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • या MPSC Group C Bharti 2024  भरती करिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत देण्यात आलेली नाही.
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी स्वतःचे वय, कॅटेगरी, आधार कार्ड, मार्कशीट यांसारख्या गोष्टी योग्य सादर करायचे आहेत. यापैकी कोणतीही गोष्ट चुकीच्या रीतीने सादर केले तर त्या उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • 4 नोव्हेंबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांनी सर्वप्रथम जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

MPSC Group C Bharti 2024 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी ज्यांनी अर्ज केलेले आहेत. आशा उमेदवारांनाच परीक्षा करिता प्रवेश पत्र मिळेल.
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथील भरतीसाठी परीक्षा करिता किंवा मुलाखतीकरिता येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला TA / DA देण्यात येणार नाही.
  • लेखी परीक्षा मधून मुलाखतीसाठी निवड होणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी येताना फॉर्मल कपड्यावर यावे.
  • सदरील MPSC Group C Bharti 2024  भरतीच्या लेखी परीक्षा दरम्यान किंवा तोंडी परीक्षा दरम्यान कोणत्याही उमेदवारांना अनुचित प्रकार केला तर त्या उमेदवारावर संस्थेकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची वेबसाईट जाहिरातीमध्ये दिलेले आहे. इच्छुक उमेदवारांनी त्या वेबसाईट द्वारे अर्ज करायचा आहे.

MPSC Group C Bharti 2024 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथील भरती संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.

  • उद्योग निरीक्षक या पदासाठी एकूण 39 रिक्त जागा असणार आहेत.
  • कर सहाय्यक या पदासाठी एकूण 482 रिक्त जागा असणार आहेत.
  • तांत्रिक सहाय्यक या पदासाठी एकूण 09 जागा आहेत.
  • बेलिफ व लिपिक गट क, नगरपाल (शेरीफ) मुंबई यांचे कार्यालय या पदाच्या एकूण 17 जागा आहेत.
  • लिपिक- टंकलेखक या पदासाठी एकूण 786 जागा आहेत.
  • सदरील भरती मधील एकूण पदसंख्या, समांतर आणि सामाजिक आरक्षण यांच्या संदर्भातील शासनाच्या नवीन सूचनेनुसार पदांमध्ये कमी जास्त होऊ शकते.
  • खेळाडू आणि दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांकरिता शासनाच्या ज्या अटी आहेत त्यानुसार परीक्षेमध्ये त्यांना सवलती मिळते.
  • दिव्यांग उमेदवार, महिला, खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, सुशिक्षित बेरोजगार या प्रवर्गातील उमेदवारांना आरक्षण देण्यात येईल.
  • MPSC Group C Bharti 2024  भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार भारताचा नागरिक असावा.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराला मराठी भाषेचे संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • सदरील भरती मधील पदांसाठी पूर्व परीक्षा 100 गुणांची असेल तर मुख्य परीक्षा 400 गुणांची असेल.

MPSC Group C Bharti 2024 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथील भरती संदर्भात माहिती खालील प्रमाणे.

  • 14 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 2:00 वाजल्यापासून सदरील भरतीसाठी अर्ज करायला सुरुवात होणार आहे.
  • 4 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 12:00 वाजेपर्यंत सदरील भरतीसाठी अर्ज करू शकता.
  • स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये चलन भरलेली स्लीप उमेदवारांनी 6 नोव्हेंबर 2024 पर्यंत जमा करायचे आहे.
  • 7 नोव्हेंबर 2024 या तारखेनंतर उमेदवार चलनाद्वारे शुल्क भरू शकत नाहीत.
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथील भरती संदर्भात वरती देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. संपूर्ण माहिती पाहण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • ‘मंत्रालय, मुंबई, बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, तिसरा मजला, एम.जी रोड, हुतात्मा चौक, मुंबई – 400001’ या पत्त्यावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कार्यालय आहे.
  • वयाची 19 वर्षे पूर्ण असलेला कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊ शकतो.
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा 38 वर्षापर्यंत देता येते.
  • सदरील भरती मधून उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधीक्षक, तहसीलदार, नायब तहसीलदार , गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी यांसारखी सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे भरले जातात.

Leave a Comment